Saturday, July 30, 2011

गेली २१ वर्षं - मराठी नाटक !!!

       कालच मित्रांबरोबर  "गेली २१ वर्षं" नाटक बघितलं. बरेच दिवस paper मध्ये वाचत होतो, लोकांकडून ऐकत होतो की ते फार भारी नाटक आहे आणि एकदा तरी निश्चित बघायलाच पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे जेव्हा त्याचा show होणार आहे असं कळलं तेव्हाच जायचं निश्चित केलं आणि नशिबाने ticket पण मिळालं. अपेक्षेप्रमाणे "खेळ" House-full होता आणि त्यातही जवळ जवळ सगळी मंडळी आमच्याच वयाची होती त्यामुळे जरा बरं वाटलं. 

     नाटकाची कथा नावाप्रमाणेच आहे, कथा एका २१ वर्षाच्या मुलाची आणि त्याच्या मनात येणाऱ्या विचारांची, त्याच्या मनाच्या घालमेलीची, त्याच्या मनात असलेल्या tension ची आणि एकंदरीतच जे जे काही त्या वाचा मुलाच्या मनात येईल, जे त्याला करावंसं वाटतं, जे तो करू शकला असता याची! निश्चितच आपण नाटक बघताना "तरुण" या नाटकातल्या प्रमुख पात्रामध्ये कुठे न कुठे आपल्याला स्वतःला पाहतो आणि त्यामुळेच तेनातक आपलासं होतं. दिग्दर्शकाचं, संवाद लेखकाचं मनापासून कौतुक त्यासाठी!!!!

     पण तरी खरा सांगू का, मला तरी अगदी मनापासून असं वाटलं की ते नाटक story ला पूर्ण वाव नाही देऊ शकलं. नाटकात ३ अंक होते. त्यातला पहिला अंक तर निव्वळ jokes आणि हसणं यात जातो आणि दुसऱ्या अंकात स्टोरी ला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, आणि माझ्या मताप्रमाणे त्यांनी हा वेळ वाया घालावला, असं नाही म्हणते की serious नाटक पूर्णवेळ serious च असायला पाहिजे पण शेवटी अशाप्रकारच्या नाटकात विनोदाला किती वाव द्यावा आणि खरंच तो तितका गरजेचा आहे का हे पण लक्षात घ्यायला हवं!

     आणि अजून गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, "कुठलीही" गोष्ट अथवा incident हा पूर्णपणे दाखवला गेला आहे असं मला तरी नाही वाटलं, ते प्रत्येक part त्यांनी दाखवला आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने दाखवू शकले असते असं सारखा वाटतं. कथा इतकी सुरेख आहे पण ती आपल्यासमोर तितक्या क्षमतेने सादर होते असं वाटत नाही.

    काही गोष्टींचा तर मला खरंच उलगडा नाही होत! "रघू" चं character का घेतला आहे? हे तर मला कळलंच नाही. कदाचित तो dashing, dude असा आहे म्हणून घेतलं असावं पण त्याची खरंच गरज होती का? TV वरचा एक anchor खरंच एवढा माणसाच्या खऱ्या आयुष्यात influential असतो का? आणि तो ही, एका सुशिक्षित कुटुंबातील, सुजाण मुलाच्या बाबतीत? नाही पटत मला तरी!!! अजून एक गोष्ट खटकते ती म्हणजे "चाफा" हे character. किती २१ वर्षांच्या मुलांच्या आयुष्यात त्या वयात मुली येतात आणि त्याही अगदी kissing पर्यंत?? त्यापेक्षा चाफा हे त्याच्या मनातला पात्र असतं तर जास्त योग्य वाटलं असतं.

     आता जरा नाटकाच्या शेवटाबद्दल, नाटकाचे २ शेवट दाखवले आहेत, एकामध्ये "तरुण" त्याच्या treatment नंतर बरा होतो आणि सामान्य माणसाप्रमाणे संसाराला लागतो, (हा शेवट माझ्या तरी मनाला जसता पटलं आणि त्याहून तो जास्तं practical आणि close to real life वाटला), सामान्य माणसाच्या मनात कितीही rebellious विचार आले तरी शेवटी तो कधी ना कधीतरी जीबनाच्या रहाटगाडग्यात अडकतोच आणि त्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नसतो, म्हणूनच माला हा शेवट ज्सती पटला. दुरा शेवट असा होता की ज्यात त्याला एकटं रहावसं वाटतं, बाहेर बघू नये असा वाटतं आणि आत्ममग्न व्हावं असा वाटतं. हे मला अजिबात पटलं नाही, आणि त्याचं कारण काही अंशी नाटकातच आहे, नाटकात एकावेळेस तो स्वत:च म्हणतो की प्रत्येक पिढीला त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येक माणसाला त्याचे प्रॉब्लेम्स असतात वगैरे, मग असं असूनसुदधा आणि हे मान्य असूनसुद्धा त्याची ही अवस्था का होते? प्रॉब्लेम्स तर प्रत्येकालाच असतात, पण म्हणून काय माणसाची अशी अवस्था व्हावी का ? मला नाही पटलं हे!!!!

     आणि शेवटी मला असं अगदी मनापासून वाटतं के हे नाटक ज्याला एवढी छान स्टोरी आहे ते या मंडळींना अधिक चांगल्या प्रकारे मांडता आलं असतं. मुद्द्गे फार सुरेख आणि रोजच्या आयुष्यातले आहेत पण तरीही ती अधिक चांगल्या पद्धतीने नाटकात सादर करता आले असते, आणि हे नाटक अधिक चांगल्या पद्धतीने खुलवता आलं असतं. कुठलाही part मनाला आतपर्यन्त स्पर्श करतो असं वाटत नाही.

     पण हे सगळं असलं तरी हे नाटक एकदा तरी निश्चित बघावं असं मला वाटतं. आणि "नाटक कंपनी" च्या सर्व group ला मनापासून दाद देऊन, आणि त्यांचं त्यांच्या out of box thinking साठी कौतुक करून  मी माझा पाल्हाळ आता थांबवतो......................... 









No comments:

Post a Comment