Saturday, July 23, 2011

पोलिसांच्या बाबतीत आपण ही गोष्ट लक्षात घेतो का ?

    ते पैसे खा खा खातात. पण फक्त ते एकटेच खाणारे आहेत का ?

    रोज आपण पेपरामध्ये  किमान एक ना दोन बातम्या ज्या पोलिसांच्या गलथान कारभाराबद्दल भाष्य करतात  त्या वाचत असतो आणि त्यातही "सकाळ" सारखा सुशिक्षितांचा paper या कामात सदैव पुढे असतो. आपण कायमच पहात असतो, वाचत असतो कि हे police खा खा खातात आणि आपली कामं धड करत नाहीत.
 
    मी इथे कुठल्याही प्रकारे त्यांच्या निष्क्रियतेच समर्थन नाही करते पण आपण इतर काही गोष्टी लक्षात घेतो का ?? police खातात. मी हे अजिबात नाकारत नाहीये पण, मला एक सांगा आजच्या काळात कोण माणूस १०-१५ हजाराच्या नोकरीत आपला अख्खा ४ जणांचा संसार नीट प्रकारे चालवू शकेल ? आज १०-१५ हजार तर किरकोळीत फी असते मोठ्या मोठ्या शाळांची, परत college च्या फी बद्दल तर ना बोललेलंच बरं! आणि हो, हे सगळं रोज १४-१५ तास duty वर राहून आणि आठवड्यातले ७ ही दिवस. विना थकता, आणि थकलं तरी तक्रार तरी कोणाला करणार हो?

     अर्थात मी हे बोललो आहे ते साध्या post वरच्या पोलीसाबद्दल. वरच्या level चे किती कोडगे असतात ते काही वेगळ सांगायची गरज नाही.

    माझ्या या लिहिण्यामागचा अर्थ असा अजिबात नाही काही आपण या लोकांना त्यांनी मागितली की चिरीमिरी द्यावी किंवा लगेच १०० चे गांधी बाब त्यांच्या हातावर टेकवावेत पण ही सुद्धा बाजू आपण लक्षात घ्यायला पाहिजे, खरा तर आपण लक्षात घेण्यापेक्षा त्या हलकट राजकारण्यांनी याकडे नजर टाकायला पाहिजे (जर त्यांना "जनतेच्या सेवेतून वेळ मिळाला तर").

    प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात...................

No comments:

Post a Comment